Posts

Showing posts from December, 2024

Review : Meiyazhagan

Image
  मैय्याझागन --Netflix एकमेकांशी बोलताना दोन पुरुष मित्र अनेकदा खेळ(क्रिकेट), राजकारण, पोरी(/बायका) , पैसा , प्रगती , टिंगलटवाळी , चित्रपट इत्यादी टॉप लेव्हल topics वर चर्चा/गप्पा करतात. थोड्याफार फरकाने इतर विषय येत असतीलही. अंतर्गत खोल भावना , मनातलं दुःख , यातना, वैषम्य , खिन्नता असल्या विषयांवर आधारित डायलॉग सुरू झाला की त्या व्यक्तीबद्दल एक पूर्वग्रह तयार करण्यात येतो. असल्या भावना अनावृत्त करणाऱ्या पुरुषाला लगेचच कमकुवत , बाईल्या , beta male, असे हिणवण्यात येते. पितृसत्ताक व्यवस्था अशीच काम करते. "मैय्याझागन" मध्ये या पुरुषसत्ताक stereotype ला छेद दिला जातो. यातली पुरुष पात्र मनातल्या अंधाऱ्या कोपऱ्यातल्या गोष्टी एकमेकांना सांगताना कचरत नाहीत , की "ओळख बघू मी कोण?" असे विचारताना मागून येऊन हाताने डोळे झाकताना लाजत नाहीत. एकमेकांसमोर मनमोकळेपणे अश्रू ढाळतना त्यांना एकमेकांची लाज वाटत नाही , की आपल्या आतेबहिणीच्या लग्नात ,भर लग्नमंडपात तिच्या पायात पैंजण घालताना स्वतःच्या डोळ्यांतून गळणाऱ्या अश्रुंकडे नीलाजरेपणे सामोरे जाताना कोमेजून जात नाहीत. यातला पुरुष स्वतः...

Adios my watch!

  धावण्याची माझ्याशी गाठ पडून आता अनेक वर्षे झालीत. आता एखादा run इतका अंगवळणी पडलाय की मी धावतोय की एखादं दैनंदिन कंटाळवाणे काम करतोय यात मला आता फरक करता येत नाही! जेव्हा running सुरू केलं तेव्हा एक जोडी sneakers, एक कॉटनची शॉर्ट्स, कॉटनचाच टीशर्ट , आणि फोन मधलं strava इतकच सोबत असायचं. एक वर्षात कॉटन ची जागा dryfit मटेरियल नी घेतली आणि sneakers ची जागा running shoes ने घेतली. फोन:strava तसच राहिलं आणि एक वर्ष. महागडं watch घ्यायची तेव्हा लगेच इच्छा झाली नाही कारण या कंटाळवाण्या व मनोधैर्याची आय-भैन एक करणाऱ्या व्यायामप्रकारात आपण फार काळ टिकू असं मला अजिबात वाटलं नाही , आणि त्यामुळे असल्या श्रीमंत हौशी, आरामात टीकेचं लक्ष्य बनू शकत होत्या. तसंही लोकं पाडून घालून बोलायला तयारच असतात. तरी मग जशी गरज वाढत गेली तसं एक GPS घड्याळ घेतलंच, जे घालून मी पोहूही शकत होतो. ज्यादिवशी हे घड्याळ माझ्या फोनशी sync झालं,तेव्हापासून माझ्या फोनचा रिंगटोन बंद झाला. माझं हे घड्याळ , माझ्यासोबत खूप खूप ठिकाणी फिरलं, अगदी DRDO पासून कॅनबेरा पर्यंत त्याने मजल मारलिये, त्याने कितीतरी क्षेपणास्त्रांशी ह...

Review - NYAD

Image
  Nyad (Movie review) --Netflix When everyone is going ballistic over Dunki , which IMO is such an uncreative , poorly written, researched , acted and directed movie , one tends to make a mistake of missing out on hidden gems. Nyad is one of them! Nyad is the story of resilience and strength. It is about a certain woman named Nyad who wants to swim from Cuba to Florida - 103 miles straight, in shark infested waters , poisonous and life-threatening jelly fish , cold cold temperatures and nasty water currents , which can fuck your course over in a jiffy and crush you like tin cans. Well , Nyad wants to do all of that at 60 years of age. She has the unwavering support of her dearest friend and long time partner Bonnie , in this journey. Nyad fails a number of times , sometimes she's on the brink of death, sometimes she has hallucinations and she breaks down , but what doesn't break is her resolve and her fascination with the challenge. Will she meet her desire or her maker ? Jodi...
 5 Feb 2024 Ignoring abuse is a crime! दोन एक आठवड्यापूर्वीची गोष्ट.स्थळ वेस्टेंड थिएटर समोरचा SGS मॉल. दोन मित्र आणि मी , त्यांची खरेदी संपवून बाहेर थांबलो होतो. साधारण 5pm ची वेळ आणि त्यात weekday असल्याने गर्दीही तुरळकच होती. बाहेर रिक्षावाले आपली रिक्षा लायनीला लावून गप्पा मारत उभे होते. शेजारीच दोन तीन भिकारी पोरं काहीतरी विकत होती. म्हणजे purse बिर्स असं काहीतरी. बाहेर येणाऱ्या बायका पोरी त्यांचे probable गिऱ्हाईक! सहसा मॉल मध्ये खरेदीला आलेला व्यक्ती क्वचीतच असं बिन ब्रँडी माल घेते हे माझं generalisation. त्यामुळे त्या पोरांना मार्केटिंग साठी थोडा जास्तच effort घ्यावा लागत होता. त्यातच एक दहा बारा वर्षाचं पोरगं एका बाईला विनवणी करायला लागलं, म्हणजे तिला हात लावून "मॅडम लो ना , सस्ता देता हू" वगैरे आणि तश्यात तोल जाऊन ती बाई पडता पडता वाचली. तडक एक समाजसेवक रिक्षावाला तावातावाने आला आणि त्या कवळ्या पोराचं बकोट पकडुन त्याला सौम्य शिवीगाळ करायला लागला.ते पोरगं पण रस्त्यावरच वाढलं होतं. ते पण उलट उत्तरं देत बसलं आणि शब्दाला शब्द वाढत गेला आणि काही समजायच्या आत त्या समाजसे...
 16 Sep 2023 बिर्याणी असं म्हणतात की बिर्याणीचा शोध अकबराने लावला. त्याच्या सैन्याला कुठल्याही मोहिमेवर निघण्या आधी भरपूर protein आणि carb मिळावे हा त्यामागचा सरळ उद्देश्य. म्हणजे सकाळी सकाळी अकबराच्या सैन्यातील कुठल्या मोईनउद्दिन ने ताटभर बिर्याणी हाणली तर डायरेक्ट रात्री कॅलेंडरने(Mr. इंडिया फेम) वाढल्यावर किंवा बहात्तर पर्यांनी घास भरवल्यावर या मोईनउद्दिनचा आत्मा अन भूक शांत होत असावी. Anyway , तर पुणेकरांना या बिर्याणीचा पाहिला साक्षात्कार कँपात आला. Dorabjee ने मटण धनसाक, पात्रा नी माच्छ, लगन ना stew आणि ofcourse बिर्याणी सारख्या विविध चविष्ट आणि कधी कधी सात्विक पुणेकराला निषिद्ध अश्या पारसी/मुस्लिम उत्कृष्ट cuisines खाऊ घातल्या आणि प्रचंड प्रसिद्ध केल्या. तसं तर पुण्यात आसरा, दुर्गा सारख्या रस्सा भाकरी/चपाती वाढणाऱ्या अस्सल मराठा खानावळी होत्याच पण कॅम्प म्हणजे जुन्या साहेबाचा फील देणारा,स्कर्ट घालूनही उघड्या गोऱ्या पोटऱ्या दाखवणारा, स्लिव्हलेस टॉप अन् गॉगल घातलेल्या देखण्या पोरींचा वावर असलेला आणि पुण्यात असूनही पुण्यात नसल्यासारखा जरासा posh area, पेठेत राहणाऱ्या शालीन पुणे...

Review - Oppenheimer

 3 Aug 2023 Oppenheimer (Movie Review) Christopher Nolan has moved far away from his classic style of film making and he has created a fluidic symphony when he made this movie. The first thing you notice is that 'Oppenheimer' doesn't feel like a movie or even a documentary. Rather one will perceive it like an aria , and why not , with a super gripping but soothing background score and awe inspiring visuals sans CGI and a nippy screenplay , it has to be an aria! It is not only the story of the atom bomb but somewhat the politics around it. Politics which couldn't cure the anathema hurled towards brilliant minds like Turing and destroyed their lives. Oppenheimer was the modern Prometheus, which is also the opening line of the film , who stole fire from the gods and delivered it to earth and so was condemned forever. If you come from science, there are overwhelming fanboy moments for you throughout the movie when titans like Niels Bohr , Richard Feynman, Einstein, Enrico ...
 12 June 2023 Auzzie! Things you say Down under 1. No worries : It can mean anything from "You're welcome" as in a response to " Hey mate , thanks for saving my life" " Don't worry about it" as in a response to "Sorry I kicked your ass" "It's all right" , as in a response to "I am a few cents short for the coffee " "Sure thing" as in a response to "Is it okay if I pay with a smile instead of cash" "No worries" is something which you can say if you can't think of what to say. Although "No Wucka’s" is the more Aussie way of saying that. 2. Mate : Australia is about "Mateship" so everyone is everyone's mate , "Oi mate , watch your cake hole" it can be a covering word to sledge , if used correctly. 3. Jimmy Grant : Is a slur for an immigrant Caution: use carefully 4. Barbie: An emaciated modern doll? .... Nope! It's short for BBQ which is again s...
Image
 23 May 2023 Racism in Australia प्रगत देश म्हटलं की प्रकर्षाने आपल्याला दिसतात (आणि दाखवल्या जातात) त्यातल्या प्रगतीच्या पाऊलखुणा. उंचच उंच बिल्डिंग , गुळगुळीत रस्ते , सुटसुटीत transport व्यवस्था , सामान्य व्यवहारातील शिस्त,लोकांची अदब, स्वच्छ्ता ,अगदी जंगलातही सापडतील अशी सुबक आणि निर्मळ toilets, खाण्या पिण्याच्या अजब सवयी अन् अवास्तव वाटावं असं आभाळ. असा देश या स्तरावर पोचायचं reasoning बऱ्याचदा डार्क असतं आणि आपल्यापर्यंत तो इतिहास सहज पोचणार नाही याची भक्कम रचना तिथल्या राज्यकर्त्यांनी किंवा सिस्टीम ने करून ठेवलेली असते. जालियनवाला इथल्या भीषण हत्याकांडाची अजूनही ब्रिटिशांनी अधिकृत माफी मागितलेली नाही.अमेरिकेतही त्यांच्या white settlers ने तद्देशिय इंडियन्स चा पाशवी नरसंहार घडावला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या pogroms तर भारतीयांनी भारतातही घडल्या/घडवल्या आहेत आणि त्याबद्दल सामान्यतः ब्र ही काढला जाऊ नये अशी दहशत निर्माण केलेली आहे. ऑस्ट्रेलिया हा त्याच ब्रिटिशांच्या कॉमनवेल्थ चा एक भाग. इथल्या स्थापत्यावर, इथल्या घडणावळीवर आणि इथल्या इतिहासावर ब्रिटिशांची भक्कम छाप आहे. इथली ...
Image
 24 April 2023 Sachin !!! आमच्याकडे लाकडी कपाटात जेरबंद असलेला ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही साधारण १९८४ मध्ये आला असं पुसटसं आठवतं मला. बहुदा खूप महिने वाट पाहिल्यावर , रेड टेपाला ओलांडून एका संध्याकाळी तो घराच्या एका कोपऱ्यात ऐटीत establish झाला. त्यावर तेव्हा विम्बल्डन चालू होतं हेही पुसटसं आठवतंय. '83 च्या क्रिकेट वर्ल्ड कप ने भारतीय मनांची समीकरणे सपशेल भरकटवून टाकली होती. त्यानंतर आलेला रिलायन्स कप आणि मावळतीला आलेले गावस्कर, वेंगसरकर, श्रीकांत इत्यादींना पर्याय कोणता असावा इतका विचार करायची amateur बुद्धी माझ्यात तयार होत होती. तेव्हाच कपिल देव ने क्रिकेट ट्रेनिंग साठी टीव्ही वर रविवार सकाळी एक अर्ध्या तासाचा कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली. आणि मी ती अधाश्यासारखी पाहू लागलो. Outswing , inswing , frontfoot, backfoot , इत्यादी गोष्टी कळू लागल्या आणि मी आणि माझी टीम, घराजवळच्या वावरात 20, 25 पैश्याच्या मॅचेस लावून त्या कसबाची अंमलबजावणी करू लागलो. कपिलच्या त्या कार्यक्रमात त्याच्याबरोबर एक कुरळ्या केसाचा 14, 15 वर्षाचा तरतरीत पोरगा असायचा आणि त्याची देहबोली इतकी आश्वासक असायची की...
Image
 2 Jan 2023 Cycle मागच्या वर्षी मला आणखी एक व्यसन लागलं. सहसा व्यसन आणि मी एकमेकांपासून किमान दहा फूट लांब राहायचा जबर प्रयत्न करतो . म्हणजे मी तसा प्रयत्न करत असतो , व्यसन लगटच करतं जास्ती. आमच्यातल्या पकडापकडीचा प्रयास जोवर आमच्यातल्या Fibonacci spiral च्या परिघाला त्या टोकाचं व्यसन माझ्या टोकाला असलेल्या माझ्या सूक्ष्म अस्तित्वात ढांगा टाकत, आक्रंदतत जवळ जवळ येत मिसळून जात नाही तोवर लाईफ होत राहतं , सपाट अन् बेचव! तेव्हा मग धुरळा उडतो , देहभान का काय ते व्यापून टाकतो आणि तो धुरळा माझ्या अस्तिवाच्या नॅनो particle मापाच्या ठिकऱ्या उडवून टाकतो. व्यसन हे निर्गुण आहे म्हणजे समजा चांगलं म्हणावं असं कुठलंही व्यसन जरी एकाला लागलं तरी त्या एकाच्या (किंवा एकीच्या) अवतीभोवती अशक्य बदल घडायला लागतात. त्या व्यसनापोटी ती व्यक्ती तिला त्या व्यसनापासून लांब नेणारे इतर सगळे पाश तोडू लागते आणि तिचा स्मिगल चा गोलम केव्हा होऊन जातो हे कळेपर्यंत ती व्यक्ती इतर सर्वांच्या नजरेत एक freak होऊन बसते. सिगारेटचं व्यसन जसं वाईट म्हणतात तसं एखाद्याला संडास स्वच्छ ठेवायचाही OCD असू शकतो. Crack , coke , meth ...
Image
 1 Oct 2022 पडणार यार हा आज.. उगाचच वाईट वाटून राहतंय. कॉलेज ला असताना चांदणी चौक म्हणून कुठलं तरी दिव्य शक्तीपीठ अस्तित्वात आहे याचा साक्षात्कार झाला होता आणि सायकल ने रपेट करत , काय असतं बाबा चांदणी चौक म्हणून पाहायला , आम्ही मित्र गेलो होतो , अन् सपशेल मूड हाप झालेला. चौकात काहीच ,कुणीच नव्हतं, आता सारखा ना हायवे , ना ते up & above , ना कुठलं दुसरं हटील. फक्त झाडी , दोन पाच गाड्या अन् येड्यागत चढ. चढावरच,कोपऱ्यात एक कॉफी चा टपरी टाइप कॅफे होता , जो तेव्हा दुपारी बंद होता. आम्ही थोडा श्वास घ्यायला मग या पुलावर जाऊन बसलो होतो.वैतागलेल्या उन्हात ! काही वर्षात हायवे बांधून झाला , आणि खऱ्या अर्थाने चांदणी चौक बहरला.सोबत हा पूल सुधा! तोपर्यंत , Weekends ला आम्हाला चांदणी चौक एक go to jaga zali होती , आणि पार्टी बिर्टी झाली की या पुलावर , कुल्फी, आइस्क्रीम विकणाऱ्या गाड्या असायच्या तिथे जाऊन पडायचो,एक एकुलती पानाची टपरी ही होती , आणि एखादं प्रेमातलं कपल , भोवती भिक मागणारी छोटी पोरं अन् फुगे विकणारे त्यांचे आई बाप! तेव्हा हा पूल कधीच क्रॉस केला नव्हता, पुढे बावधन , पाषाण अजूनही थोड...
Image
 Sep 13 2022 मिसळ ! मला आवडत जरी असला तरी मिसळ हा item अतिरेकी ओव्हर रेटेड आहे. एक त्याचा रस्सा आणि तर्री सोडली तर त्यातील बाकी सगळे मिसळणाचे भाऊबंद आरामात , ऑफ द शेल्फ सापडतात. जसं की फरसाण ,शेव,कांदा,टमाटा,कोथिंबीर आणि पाव. तसंही मिसळ या पदार्थाची रेंज फारच लिमिटेड आहे. पुण्यातल्या मिसळीत (example म्हणजे श्री मिसळ) बटाटा आणि पोहे मिसळून त्याला एक वेगळाच elite टच देण्याचा प्रयत्न झाला आहे आणि बेडेकर मध्ये तर वाटी वाटी रश्श्याचा तोळा तोळा हिशोब लावलेला असतो, आणि शेवटी गल्ल्यावर बसलेल्या मालकांच्या आग्रहाखातर शेंगदाणा लाडू (पैसे देऊन) खाऊन पहावाच लागतो : कितीही नाही म्हणा! तर मिसळीचा एक saturation point आलाय तसा नवनवीन मिसळ कट्टे नवनवीन प्रयोग सुरू करून राहिलेत. मिसळी बरोबर ताक जरा well-known होतं पण मग त्यात आता पापड , गुलाबजाम , दही , काकडी , जिलबी , लोणचं, आणि त्यातही भर म्हणून की काय , तर काहींनी मिसळ पॅकेज सुरू केलीत आणि त्यात extra असतं काय तर एक पाण्याची बॉटल. काहींनी unlimited मिसळ सुरू केलीय. पण "unlimited" या आश्वासक आणि वेधक नामकरणाकडे जरा शंकेनेच पाहावं लागतं , का...
 May 28 , 2022 नाटक,सिनेमा, केबल टीवी ,इंटरनेट आणि आता OTT , अशी गेल्या शंभरच्या वर वर्षांची परंपरा मराठी कला जगताला आहे. भारतीय चित्रपट संस्थेच्या स्थापनेचे श्रेय प्रामुख्याने मराठी चित्रपट निर्माते घेऊ शकतात इतकं योगदान त्यांचं त्यात आहे,जसे की तोरणे, फाळके , बाबुराव पेंटर , आणि थोडं उशिरा आलेले भालजी पेंढारकर , मास्टर विनायक ,वी शांताराम,जब्बार पटेल आणि असे अनेक दिग्गज चित्रपट निर्माते होऊन गेलेत ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया भरला. अगदी चार पाचशे वर्षांपासून मराठी श्रोतुवर्ग अभंग-पोवाडा- लावणी इत्यादीने सुरुवात झालेल्या करमणुकीच्या स्रोतांचे यथोचित रसपान करीत आला आहे आणि प्रगल्भ झाला आहे. त्यातच पुस्तकं,लोकगीतं , आणि अशी इतर करमणुकीची साधनं आहेतच. ही असली वाटचाल पाहता आज मराठी करमणुकीचं घोडं कुणी अडवलं? टीवी वरील मराठी मालिकांचा इतका सुमार दर्जा कसा काय झाला? कौटुंबिक कलह , भांडणं , द्वेष, मत्सर , धर्म, देव , इतिहास हा पॅटर्न सोडला तर आज काहीही पिकवलं जातच नाहीये , किंवा ना त्याला विकण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. मराठी लेखक बहुदा पुस्तकांमध्येच किंवा मासिकात अडकून पडलेत. ट...