5 Feb 2024


Ignoring abuse is a crime!
दोन एक आठवड्यापूर्वीची गोष्ट.स्थळ वेस्टेंड थिएटर समोरचा SGS मॉल. दोन मित्र आणि मी , त्यांची खरेदी संपवून बाहेर थांबलो होतो. साधारण 5pm ची वेळ आणि त्यात weekday असल्याने गर्दीही तुरळकच होती. बाहेर रिक्षावाले आपली रिक्षा लायनीला लावून गप्पा मारत उभे होते. शेजारीच दोन तीन भिकारी पोरं काहीतरी विकत होती. म्हणजे purse बिर्स असं काहीतरी. बाहेर येणाऱ्या बायका पोरी त्यांचे probable गिऱ्हाईक! सहसा मॉल मध्ये खरेदीला आलेला व्यक्ती क्वचीतच असं बिन ब्रँडी माल घेते हे माझं generalisation.
त्यामुळे त्या पोरांना मार्केटिंग साठी थोडा जास्तच effort घ्यावा लागत होता. त्यातच एक दहा बारा वर्षाचं पोरगं एका बाईला विनवणी करायला लागलं, म्हणजे तिला हात लावून "मॅडम लो ना , सस्ता देता हू" वगैरे आणि तश्यात तोल जाऊन ती बाई पडता पडता वाचली. तडक एक समाजसेवक रिक्षावाला तावातावाने आला आणि त्या कवळ्या पोराचं बकोट पकडुन त्याला सौम्य शिवीगाळ करायला लागला.ते पोरगं पण रस्त्यावरच वाढलं होतं. ते पण उलट उत्तरं देत बसलं आणि शब्दाला शब्द वाढत गेला आणि काही समजायच्या आत त्या समाजसेवक रिक्षावाल्याने त्या दहा बारा वर्षाच्या पोराच्या कानावर एक सणसणीत लगावली. सॉलिड लागलं असणार त्या पोराला. कारण तो एकाएकी ओक्साबोक्शी रडायला लागला. बहुतेक लागलं कमी असावं , pain बहुदा त्याच्या परिस्थितीच्या हतबलतेचं असावं , झालेल्या अपमानाचं आणि त्याबद्दल त्याला काहीही करता येत नसल्याचं असावं. रिक्षावाला आपण आज समाजात काहीतरी value add दिली याच आवेशात होता आणि त्या पोराचं विव्हळण आणि आक्रोश त्या रिक्षावल्याच validation!
हे सगळं केवळ 30 सेकंदात झालं होतं , आम्हाला काहीही समजायच्या आत.
आता याबद्दल काहीतरी करण्याचा आमच्या समोर एक सोपा आणि एक अवघड असे दोन पर्याय होते.
आम्ही अर्थातच सोपा पर्याय निवडला!
आम्ही त्या पोराच्या बाजूने उभे राहिलो , आणि त्या पोराला त्या समाजसेवी रिक्षावाल्यापासून बाजूला केलं. रिक्षावाल्याला सणसणीत शिव्या घातल्या आणि त्याला जरी कळत नसलं तरी त्याने कसा गुन्हा केलाय हे सांगायला लागलो. तसे त्याचे अजून काही समाजसेवी मित्र गोळा झाले.
आता वातावरण तंग होणार इतक्यात एक धिप्पाड गोरा इराणी type पोरगा आला आणि रिक्षावाल्याला म्हटला "ये आपने जो किया वो मै आपके साथ करू क्या अभी"
एक तर त्याचा आवाज एकदम घोग्रा म्हणजे अमरीश पुरी सारखा commanding होता आणि शिवाय त्याचा आकार तर आडदांड होताच.
मग ते 6 ,7 समाजसेवी मित्र आपापल्या रिक्षात जाऊन बसले. मूळ समाजसेवक रिक्षावाला मग आर्जवाने आणि अदबीने आपली बाजू मांडायला लागला. परत अशी चूक करणार नाही असंही म्हटला.
आमचा एक छोटासा विजय झाला होता. विजय त्याची जिरवली याचा नसून , त्या रिक्षावाल्याला आपण जे केलं ते चूक आहे आणि social justice नामकी चिडिया हर जगह मंडराती है याची प्रचिती होणे , हा विजय! सगळीच माणसं मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्यायाकडे दुर्लक्ष करण्याचा अवघड पर्याय निवडत नसतात , हा विजय!
त्या पोराला पाणी प्यायला दिलं आणि थोडे पैसे द्यायला लागलो तर नको म्हटला.तो पोरगा अजूनही कान धरून होता , भलताच लाल झाला होता, अश्रू गाळत होता पण त्याच्या डोळ्यात विलक्षण समाधान दिसत होतं.
त्या इराणी पोराला thanks म्हटलं आणि आम्ही पुढे एका बार मध्ये दारू प्यायला बसलो!

Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen