Sep 13 2022

मिसळ !

मला आवडत जरी असला तरी मिसळ हा item अतिरेकी ओव्हर रेटेड आहे. एक त्याचा रस्सा आणि तर्री सोडली तर त्यातील बाकी सगळे मिसळणाचे भाऊबंद आरामात , ऑफ द शेल्फ सापडतात. जसं की फरसाण ,शेव,कांदा,टमाटा,कोथिंबीर आणि पाव. तसंही मिसळ या पदार्थाची रेंज फारच लिमिटेड आहे.
पुण्यातल्या मिसळीत (example म्हणजे श्री मिसळ) बटाटा आणि पोहे मिसळून त्याला एक वेगळाच elite टच देण्याचा प्रयत्न झाला आहे आणि बेडेकर मध्ये तर वाटी वाटी रश्श्याचा तोळा तोळा हिशोब लावलेला असतो, आणि शेवटी गल्ल्यावर बसलेल्या मालकांच्या आग्रहाखातर शेंगदाणा लाडू (पैसे देऊन) खाऊन पहावाच लागतो : कितीही नाही म्हणा!
तर मिसळीचा एक saturation point आलाय तसा नवनवीन मिसळ कट्टे नवनवीन प्रयोग सुरू करून राहिलेत. मिसळी बरोबर ताक जरा well-known होतं पण मग त्यात आता पापड , गुलाबजाम , दही , काकडी , जिलबी , लोणचं, आणि त्यातही भर म्हणून की काय , तर काहींनी मिसळ पॅकेज सुरू केलीत आणि त्यात extra असतं काय तर एक पाण्याची बॉटल.
काहींनी unlimited मिसळ सुरू केलीय. पण "unlimited" या आश्वासक आणि वेधक नामकरणाकडे जरा शंकेनेच पाहावं लागतं , कारण unlimited काय असतं, तर पाव आणि रस्सा!
बरं, हे जरा uncreative आणि सपक वाटतंय म्हणून मग जरा कल्पक मिसळ-मालक barbecue मिसळ, (पुण्याची जान) चुलीवरची मिसळ, चिकन मिसळ (याला कुठल्या तरी IPC कलमाखाली अटक केली पाहिजे) , जैन मिसळ सुरू करून , प्रसिद्ध करून , लोकांना त्यासाठी रांगा लाववून आणि खायला घालून , त्यांनी त्यांच्या हॉटेलला आणि मिसळीला एका cult status मध्ये रुपांतरीत केलंय! बेसिक मिसळ म्हणजे पाव आणि रस्सा!
मिसळ आणि बिर्याणी या दोघात तेच साम्य आहे. बिर्याणी ही मिसळीची श्रीमंत जाऊ! बनवायला कष्ट कमी, आणि पुरायला आणि उरायला मजबूत.
तर बिर्याणी बद्दल पुन्हा कधीतरी ... 😀

Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen