1 Oct 2022
पडणार यार हा आज..
उगाचच वाईट वाटून राहतंय.
कॉलेज ला असताना चांदणी चौक म्हणून कुठलं तरी दिव्य शक्तीपीठ अस्तित्वात आहे याचा साक्षात्कार झाला होता आणि सायकल ने रपेट करत , काय असतं बाबा चांदणी चौक म्हणून पाहायला , आम्ही मित्र गेलो होतो , अन् सपशेल मूड हाप झालेला.
चौकात काहीच ,कुणीच नव्हतं, आता सारखा ना हायवे , ना ते up & above , ना कुठलं दुसरं हटील. फक्त झाडी , दोन पाच गाड्या अन् येड्यागत चढ. चढावरच,कोपऱ्यात एक कॉफी चा टपरी टाइप कॅफे होता , जो तेव्हा दुपारी बंद होता. आम्ही थोडा श्वास घ्यायला मग या पुलावर जाऊन बसलो होतो.वैतागलेल्या उन्हात !
काही वर्षात हायवे बांधून झाला , आणि खऱ्या अर्थाने चांदणी चौक बहरला.सोबत हा पूल सुधा! तोपर्यंत , Weekends ला आम्हाला चांदणी चौक एक go to jaga zali होती , आणि पार्टी बिर्टी झाली की या पुलावर , कुल्फी, आइस्क्रीम विकणाऱ्या गाड्या असायच्या तिथे जाऊन पडायचो,एक एकुलती पानाची टपरी ही होती , आणि एखादं प्रेमातलं कपल , भोवती भिक मागणारी छोटी पोरं अन् फुगे विकणारे त्यांचे आई बाप!
तेव्हा हा पूल कधीच क्रॉस केला नव्हता, पुढे बावधन , पाषाण अजूनही थोडंसं फॉरेन होतं मला म्हणून मग या पुलाची Radcliffe line तशीच भिजत ठेवलेली.
दहा बारा वर्षांपूर्वी , आम्ही चांदणी चौकाजवळच शिफ्ट झालो आणि पुढच्या काही वर्षात running सुरू केलं. जेव्हा distances वाढायला लागली , तेव्हा मग हा पूल ओलांडून बावधन , पाषाण , युनिव्हर्सिटी पर्यंत जाऊन यायचो.
हा पूल मला beacon वाटायचा, fishland चा चढ धावत पुलापर्यंत आलो की वाटायचं ,आलो परत..आता शेवटचे तीनच किलोमिटर धावयचंय अन् मग दुपार भर निसती बिअर अन् कोंबडं..
काल रात्री मी 3 तास यामुळे (म्हणे) गुदमरलेल्या ट्रॅफिक मध्ये काढलीत .तरीही मला कोकळणाऱ्या गाड्यांचा , बेशिस्त ट्रकांचा, किंवा, माझ्यासकट, ट्रॅफिक वाढवणाऱ्या कुणाचाही एकदाही ना राग आला की ना चीड आली. शेवटचं पाहून घेतलं याला तेव्हा बकरी ईदला नटवलेल्या बोकडासारखा स्तब्ध उभा जाणवला, पहाटे पर्यंत जगून घेतो म्हणला!

Comments
Post a Comment