2 Jan 2023


Cycle


मागच्या वर्षी मला आणखी एक व्यसन लागलं. सहसा व्यसन आणि मी एकमेकांपासून किमान दहा फूट लांब राहायचा जबर प्रयत्न करतो . म्हणजे मी तसा प्रयत्न करत असतो , व्यसन लगटच करतं जास्ती. आमच्यातल्या पकडापकडीचा प्रयास जोवर आमच्यातल्या Fibonacci spiral च्या परिघाला त्या टोकाचं व्यसन माझ्या टोकाला असलेल्या माझ्या सूक्ष्म अस्तित्वात ढांगा टाकत, आक्रंदतत जवळ जवळ येत मिसळून जात नाही तोवर लाईफ होत राहतं , सपाट अन् बेचव! तेव्हा मग धुरळा उडतो , देहभान का काय ते व्यापून टाकतो आणि तो धुरळा माझ्या अस्तिवाच्या नॅनो particle मापाच्या ठिकऱ्या उडवून टाकतो.
व्यसन हे निर्गुण आहे म्हणजे समजा चांगलं म्हणावं असं कुठलंही व्यसन जरी एकाला लागलं तरी त्या एकाच्या (किंवा एकीच्या) अवतीभोवती अशक्य बदल घडायला लागतात. त्या व्यसनापोटी ती व्यक्ती तिला त्या व्यसनापासून लांब नेणारे इतर सगळे पाश तोडू लागते आणि तिचा स्मिगल चा गोलम केव्हा होऊन जातो हे कळेपर्यंत ती व्यक्ती इतर सर्वांच्या नजरेत एक freak होऊन बसते. सिगारेटचं व्यसन जसं वाईट म्हणतात तसं एखाद्याला संडास स्वच्छ ठेवायचाही OCD असू शकतो. Crack , coke , meth ,गांजा आणि असले अमली पदार्थ जसे वाईट म्हटले जातात तसंच अनियंत्रित खाणे हे ही तितकंच वाईट असू शकतं.
कित्येक वर्ष मला running चं व्यसन लागलंय, कित्येक वर्ष मला सिगरेटचं व्यसन होतं , कित्येक वर्ष मी दारू पितो.
या तिघात दारूचा नाद केला पण वाया नाय गेला अश्या पारलौकिक संभ्रमावस्थेत मी अजूनतरी आहे. सिगरेट एक दिवशी सोडली , तो काडीमोड अजूनही तितकाच धष्टपुष्ट टिकलाय. Covid नंतरही रनिंग अजून व्यसन category मध्ये आहे , फक्त धावयची distances कमी झालेत. पण त्या मोठमोठाल्या अंतरांचं व्यसन काही केल्या जात नव्हतं अन् अश्या सगळ्यात माझ्याकडे एक सायकल आली. ती एकटी आली नाही , तिच्याबरोबर riding (cycling) च्या jerseys आल्या, gel padded shorts आल्या, सायकल वर ठिकठिकाणी घट्ट धरून बसतील अश्या बॅग्स आल्या , पाण्याच्या बाटल्या आल्या , हेल्मेट आलं, अंधारासाठी वापरायचा चष्मा आला , हवा भरायचा एकदम cute पंप आला,मागच्या पुढच्या लाईटी आल्या , रिफ्लेक्टर आले , असं करत करत अख्खा दोन चाकी संसार आला.
तिचं " लेक्शमी " असं सोज्वळ नावही ठेवलं. अन् भर सकाळी लेक्शमीवर बुढ रचवून "धर हॅण्डल मार पॅंडल" नाम घोषात कधी शंभर , कधी साठ किलोमीटर करायला लागलो ते कळलही नाही. भर पावसात , ऐन थंडीत , उन्हात , रात्री , सकाळी केव्हाही लेक्शमीला आवाज दिला तर ती निघायला तयार.
मला झोप अलिये , आत्ता नको , डोकं दुखतंय , असली कुठलीच नाटकं ती करत नाही. तिला आता अजून अजून लांब न्यायचय, तिचं व्यसन आत्ता कुठं उभारी घेतय.
एक दिवस येईल तेव्हा पाय थकतील , फुफ्फुस नको म्हणतील , तेव्हा लेक्शमीला मोटर लावून घेऊन जाईन.
व्यसन मोडणार नाही 😎



Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen