Adios my watch!

 धावण्याची माझ्याशी गाठ पडून आता अनेक वर्षे झालीत. आता एखादा run इतका अंगवळणी पडलाय की मी धावतोय की एखादं दैनंदिन कंटाळवाणे काम करतोय यात मला आता फरक करता येत नाही!

जेव्हा running सुरू केलं तेव्हा एक जोडी sneakers, एक कॉटनची शॉर्ट्स, कॉटनचाच टीशर्ट , आणि फोन मधलं strava इतकच सोबत असायचं. एक वर्षात कॉटन ची जागा dryfit मटेरियल नी घेतली आणि sneakers ची जागा running shoes ने घेतली. फोन:strava तसच राहिलं आणि एक वर्ष. महागडं watch घ्यायची तेव्हा लगेच इच्छा झाली नाही कारण या कंटाळवाण्या व मनोधैर्याची आय-भैन एक करणाऱ्या व्यायामप्रकारात आपण फार काळ टिकू असं मला अजिबात वाटलं नाही , आणि त्यामुळे असल्या श्रीमंत हौशी, आरामात टीकेचं लक्ष्य बनू शकत होत्या. तसंही लोकं पाडून घालून बोलायला तयारच असतात.
तरी मग जशी गरज वाढत गेली तसं एक GPS घड्याळ घेतलंच, जे घालून मी पोहूही शकत होतो. ज्यादिवशी हे घड्याळ माझ्या फोनशी sync झालं,तेव्हापासून माझ्या फोनचा रिंगटोन बंद झाला. माझं हे घड्याळ , माझ्यासोबत खूप खूप ठिकाणी फिरलं, अगदी DRDO पासून कॅनबेरा पर्यंत त्याने मजल मारलिये, त्याने कितीतरी क्षेपणास्त्रांशी हस्तांदोलन केलंय,marathons धावलंय ,समुद्रात डुंबलय, डोंगरात बागडलय, नदीत तरंगलय , हायवेवर जीव मुठीत घेऊन हेंदकळलय, माझ्यासोबत शॉवर घेतलाय, सायकलवर बसुन सायकलचीच अक्कल त्याने काढलीय , थोडक्यात हे घड्याळ माझ्यासारखंच वागायला शिकलंय.
कर्णाच्या कुंडलांसारख ते घड्याळ माझा अविभाज्य घटक झालं. या घड्याळाचं नावही तितकच नैसर्गिक आणि सोपं असं "घड्याळ" आहे.
घड्याळाने मला सटीक सल्ले दिलेत , "तू आता जरा शांत होशील का? तुझा HR वाढलाय" "तू आज दमला होतास, नीट झोपला नवतास का?" "वजन वाढतंय, बरका! मागल्या महिन्यात एक किलो कमी होतं. हो , आणि पाणी कमी पितोयस, काळजी घे रे बच्चू" "शाब्बास, आज चांगला धावलास, पण अमुक अमुक ठिकाणी elevation जास्ती होतं, तेव्हा cadence कमी झाला होता, पण ठीके ते"
असे आणि असे किती तरी "heart to hearts" त्याने शेअर केलेत. मला वठणीवर आणलय.
घड्याळाला केव्हा मी गृहीत धरायला लागलो ते कळलं सुद्धा नाही , आणि त्याने skynet च्या T-1000 सारखं या गोष्टीचा कधीही फायदा उचलायचा प्रयत्न केला नाही!
He was more like a "Friday" on a deserted island!
परवा धोधो पावसात मी , माझी सायकल "लेक्षमी" आणि "घड्याळ" लांबच्या फेरफटक्याला गेलो , पानशेतचा पाऊस ,चहा आणि वडापाव उपभोगुन परत आलो , घड्याळ काढून ठेवलं आणि त्याला विसरूनही गेलो. संध्याकाळी लक्षात आलं की घड्याळात पाणी शिरलंय, आणि एक पांढरा मोठा ठिपका त्याच्या स्क्रीनवर आलाय. घड्याळ शेवटचा श्वास घेतोय. घड्याळ आता जाणार या कल्पनेने मला एक विषण्ण हूरहूर लागलीय. मी घड्याळाला जिवंत ठेवायचा अतोनात प्रयत्न केला-करतोय, पण त्याच्या स्क्रीनवर त्या पानशेतच्या पावसाच्या थेंबाचं साम्राज्य पसरत चाललंय आणि काही दिवसात त्याचा स्क्रीन पूर्ण जमीनदोस्त होईल आणि त्याबरोबर घड्याळही!
त्याची जागा आता नवीन घड्याळ घेईल , पण त्या नव्या घड्याळाला "घड्याळाची" जागा घ्यायला बेसुमार प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याला तो electronics आहे हे विसरावे लागेल.
He is going to have to fill very big shoes!!

Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen