Review : Meiyazhagan


 मैय्याझागन

--Netflix
एकमेकांशी बोलताना दोन पुरुष मित्र अनेकदा खेळ(क्रिकेट), राजकारण, पोरी(/बायका) , पैसा , प्रगती , टिंगलटवाळी , चित्रपट इत्यादी टॉप लेव्हल topics वर चर्चा/गप्पा करतात. थोड्याफार फरकाने इतर विषय येत असतीलही.
अंतर्गत खोल भावना , मनातलं दुःख , यातना, वैषम्य , खिन्नता असल्या विषयांवर आधारित डायलॉग सुरू झाला की त्या व्यक्तीबद्दल एक पूर्वग्रह तयार करण्यात येतो. असल्या भावना अनावृत्त करणाऱ्या पुरुषाला लगेचच कमकुवत , बाईल्या , beta male, असे हिणवण्यात येते. पितृसत्ताक व्यवस्था अशीच काम करते.
"मैय्याझागन" मध्ये या पुरुषसत्ताक stereotype ला छेद दिला जातो. यातली पुरुष पात्र मनातल्या अंधाऱ्या कोपऱ्यातल्या गोष्टी एकमेकांना सांगताना कचरत नाहीत , की "ओळख बघू मी कोण?" असे विचारताना मागून येऊन हाताने डोळे झाकताना लाजत नाहीत. एकमेकांसमोर मनमोकळेपणे अश्रू ढाळतना त्यांना एकमेकांची लाज वाटत नाही , की आपल्या आतेबहिणीच्या लग्नात ,भर लग्नमंडपात तिच्या पायात पैंजण घालताना स्वतःच्या डोळ्यांतून गळणाऱ्या अश्रुंकडे नीलाजरेपणे सामोरे जाताना कोमेजून जात नाहीत.
यातला पुरुष स्वतःला ओळखल्यावर तिथेच थांबत नाही तर तो प्रामाणिकपणे स्वतःत बदल करतो. यातला पुरुषात सॉक्रेटिसची झलक आहे , त्याला मृत्युशय्येवरही कोंबडा वाहून, अस्क्लेपियस या दैवतेचं ऋण फेडायचे होते तसेच इथेही एका सायकलचे ऋण आहेत.
यातली स्त्रीही अशीच सशक्त, मोकळी आणि casual आहे. ती मेलोड्रामा करत नाही , तिचे तिच्या भवतालाशी सुदृढ नाते आहे. Scheme of things मधली तिची जागा तिला ठाऊक आहे पण ती त्याचा नाहक फायदा घेत नाही किंवा बोलबाला करत नाही.
यातली मंदिराच्या बाहेर फुले विकणारी स्त्रीही माणूस म्हणून दाखवली आहे , न की स्त्री/पुरुष!
असा हा मैय्याझागन चित्रपट नात्या नात्याल्या अभिव्यक्तिंच तरल प्रस्तुतिकरण करतो , अभिनिवेश टाळतो आणि सकारात्मक परिणाम साधतो.
कार्थी आणि अर्विंदस्वामी यांनी अप्रतिम व संयत अभिनय केला आहे.
नक्की पहा!

Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen