23 May 2023


Racism in Australia


प्रगत देश म्हटलं की प्रकर्षाने आपल्याला दिसतात (आणि दाखवल्या जातात) त्यातल्या प्रगतीच्या पाऊलखुणा. उंचच उंच बिल्डिंग , गुळगुळीत रस्ते , सुटसुटीत transport व्यवस्था , सामान्य व्यवहारातील शिस्त,लोकांची अदब, स्वच्छ्ता ,अगदी जंगलातही सापडतील अशी सुबक आणि निर्मळ toilets, खाण्या पिण्याच्या अजब सवयी अन् अवास्तव वाटावं असं आभाळ. असा देश या स्तरावर पोचायचं reasoning बऱ्याचदा डार्क असतं आणि आपल्यापर्यंत तो इतिहास सहज पोचणार नाही याची भक्कम रचना तिथल्या राज्यकर्त्यांनी किंवा सिस्टीम ने करून ठेवलेली असते.
जालियनवाला इथल्या भीषण हत्याकांडाची अजूनही ब्रिटिशांनी अधिकृत माफी मागितलेली नाही.अमेरिकेतही त्यांच्या white settlers ने तद्देशिय इंडियन्स चा पाशवी नरसंहार घडावला आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या pogroms तर भारतीयांनी भारतातही घडल्या/घडवल्या आहेत आणि त्याबद्दल सामान्यतः ब्र ही काढला जाऊ नये अशी दहशत निर्माण केलेली आहे.
ऑस्ट्रेलिया हा त्याच ब्रिटिशांच्या कॉमनवेल्थ चा एक भाग. इथल्या स्थापत्यावर, इथल्या घडणावळीवर आणि इथल्या इतिहासावर ब्रिटिशांची भक्कम छाप आहे. इथली जमीन काबीज करायची म्हणजे त्यांनाही इथल्या native aboriginals शी संघर्ष करावा लागला आहे. आणि हा संघर्ष वसाहतवादी जमाती करतात तसा एकतर्फी आणि निर्घृण आहे.
असा हा रक्तरंजित इतिहास आपल्याला त्यातल्या बीभत्स तपशिलासह कॅनबरातल्या museum मध्ये पाहायला मिळतो.
हा सुधा आपला इतिहास आहे, आणि इतिहास असं म्हणतात की विजेते लिहतात, हा विरोधाभास आपल्याला ऑस्ट्रेलियात पाहायला मिळतो.
या मुळे इथल्या सरकारचं विशेष कौतुक वाटतं. २००८ मध्ये सरकारनी या नरसंहाराची रीतसर माफी मागितली आहे आणि शिवाय त्या गोष्टीचा उल्लेख प्रत्येक वर्षी 13 फेब्रुवारीला केला जातो. शिवाय तुम्ही कधीही कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा शो मध्ये गेलात , तर "ही जमीन आमची नसून इथल्या मूळ निवाशांची असून आम्ही इथले custodians आहोत, आणि भविष्यातही custodians बदलणार आहेत" याची जाणीव करून देण्यात येते.
Racism असतोच , छोट्या छोट्या गोष्टीतून तो जाणवत असतो . "मी racist नाही पण..." अशी जेव्हा सुरुवात कुणी करतं तेव्हा racism चा अलार्म वाजला असं समजावं. "आम्ही आणि ते" अशी जेव्हा कुणी स्वतःची ओळख करून देतं तेव्हा समजावं की ही व्यक्ती वंशद्वेषाच्या सोप्या मार्गावर चालू लागलीये.
परंतु हे सर्व करताना "तुमच्या पूर्वजांनी हे पाप केलंय, तुम्ही त्याची परतफेड करा" हा त्याच प्रकारचा सूड आहे.
प्रगत असण्याचा एक चांगला अनुभव ऑस्ट्रेलियाने दिला याचा मला सुखद धक्का बसलाय!



Comments

Popular posts from this blog

Review : The Crown

Review : The Great Indian Kitchen